English | मराठी

ग्रंथालय

"सृजनशील साहसांना सीमा नसतात." हे ब्रीद घेऊन आमचे वाचनालय वसमत व परिसरातील वाचनप्रेमी, जिज्ञासू, ज्ञानपिपासू, लोकांची वैचारिक व व्यक्तीमत्व संपन्नातेची भूक भागवत आहे. मानवी जीवनात ग्रंथाचे, त्यातील विचारांचे महत्व अनन्यसाधारण असते. हे पुढील काव्यपंक्तीतून अधोरेखित होते.

"शब्द आणि दिवे | एक अतूट ऋणानुबंध | एक अतूट नात | दिव्यासामोर उजळून निघतात.शब्द | अन.... शब्दच घडवितात जीवनाचे दिवे | खर तर.... वाटसरूला आणखी काय असते हवे ....||"
पुढे वाचा

कार्यकारि मंडळ

ग्रंथालयाची कार्यकारिणी व सर्व सदस्य साहित्य, संगीत, चित्र, शिल्प अशा विविध कलागुणांचे अभ्यासक व आस्वादक आहेत. तसेच वाचनालयाशी संबंधित अनेकजण सृजनशील कलावंतही आहेत. याचा उपयोग वाचनालयाचा चेहरा अधिक सुंदर करण्यासाठी झाला आहे. साहित्य, विज्ञान तसेच स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी चे उपयुक्त ग्रंथ एकत्रित करून त्यांचे जतन केले आहे. त्यामुळे अभ्यासक रसिक वाचक यांना आपला व्यासंग वाढविण्यासाठी हे ग्रंथालय कार्य करत आहे.

पुढे वाचा

आमचे प्रेरणास्थान

प्रेरणा मिळाली कि माणूस विधायक कामास अधिक गतीने सुरुवात करतो. प्रेरणारुपी आशीर्वादा मुळे आत्मिक बळ व उर्जा निर्माण होते. लासिन मठ संस्थान वसमत जि. हिंगोलीचे तत्कालीन मठाधिश सदगुरु ष. ब्र. प १०८ ईश्वर शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद आणि प्रेरणेने या वाचनालयाची कोनशिला दि. २१ फेब्रुवारी १९९६ रोजी कोरली गेली. ग्रंथालयास १९९७-९८ ला शासन मान्यता मिळाली असून नोंदणी क्र. एफ २५९५ (परभणी) असा आहे. ग्रंथालयास ‘ब’ दर्जा प्राप्त झालेला आहे. महाराजांनी या कामी दिलेली प्रेरणा व सहकार्य वाचनालय स्थापणेच्यादृष्टीने अतिशय महत्वपूर्ण घटना आहे.
ग्रंथ प्रेम, अध्ययनवृत्ती, सद्विचारांना लोकांपर्यंत पोहोचविण्याची तळमळ, इ. विशेष महाराजांच्या व्यक्तिमत्व होते. त्यांचाच कार्याचा, विचारांचा वारसा चालविण्याचा प्रयत्न आम्ही ग्रंथालयाच्या माध्यमातून करत आहोत. महाराजांच्या सातत्यपूर्ण प्रेरणेतून ग्रंथालय उचित ध्येय बाळगून मार्गक्रमण करीत आहे.


ग्रंथसंपदा

ग्रंथालयात सध्या १०,००० पेक्षा जास्त वैविध्यपूर्ण विषयांची ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. त्यामध्ये साहित्य, विज्ञान, ग्रंथालय शास्त्र, अद्यावत विश्वकोश, शब्दकोश, मानस शास्त्र, तत्वज्ञान, अध्यात्मिक, योग, आरोग्य, ललित कला, छायाचित्रण, स्थापत्य शास्त्र, इतिहास, भूगोल, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, कादंबरी, नाटक, कविता संग्रह, ललित गद्य, शास्त्र व तंत्रज्ञान, संगणक, स्पर्धा परीक्षा संदर्भ, बालसाहित्य, या सर्व साहित्य वैभवाने ग्रंथालय संपन्न आहे
ग्रंथसुची

ठळक बाबी :


  Copywrite 2013 ishwargranthalaya
Design by Uma